साहित्य : 300 ग्रॅम (3 मध्यम आकाराचे) बटाटे उकडून, साले काढून-कुस्करून, ३०० ग्रॅम (५-६ मध्यम आकाराचे)कांदे सोलून बारीक चिरून
३५० ग्रॅम (५-६ मध्यम आकाराचे)टमेटो बारीक चिरून, १०० ग्रॅम (अर्धी वाटी)वाटणे वाफवून (किंवा फ्रोझन), १०० ग्रॅम (१ मोठी)ढोबळी (सिमला) मिरची बारीक चिरून, २० ग्रॅम (१२-१३ पाकळ्या)लसूण वाटून, १.५ मोठा चमचा तेल, २ हिरव्या मिरच्या चिरून, १ छोटा चमचा जीरे,दोन लिंबाचा रस, एक छोटा चमचा मीठ, २ मोठे चमचे लोणी (बटर).
सुके मसाले: १ छोटा चमचा लाल तिखट, १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिर्ची पावडर, २ छोटे चमचे पाव भाजी मसाला.
सजावटीसाठी: थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, लिंबाच्या फोडी.
कृती : एका पसरट भांड्यात तेल घालून, भांडे मध्यम आचेवर ठेवावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घालून तडतडू द्यावे. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा मधे मधे परतून चांगला मातकट रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. साधारण ८ ते १० मिनटे कांदा शिजायला लागतील, घाई करू नये.
कांदा मातकट रंगाचा झाल्यावर त्यात कुटलेली लसूण टाकावी. २ मिनटे परतून ह्यात टमेटो घालावेत. टमेटो चांगले एकजीव होईपर्यंत मिश्रण मधे मधे परतत राहावे. टमेटो, कांदा आणि लसूण छान मऊ, एकत्र झालेकी त्यात ढोबळी मिरची घालावी. थोडेसे पाणी टाकून, ढोबळी मिरची झाकण लावून शिजू द्यावी. ५ मिनिटांनी झाकण काढून त्यात कुस्करलेले बटाटे आणि पाणी टाकावे. आता हयात मीठ आणि वरील साहित्यात दिलेले सर्व सुखे मसाले टाकावे. सर्व मिश्रण ढवळून, पावभाजी साठी वापरण्यात येण्याऱ्या यंत्राने छान एकजीव करावे. झाकण ठेवून ५ मिनटे शिजू द्यावे. झाकण काढून, त्यात मटारचे दाणे घालावेत. २ मिनटे भाजी उकळू द्यावी. चव बघून, मीठ-तिखट हवे असल्यास घालावे. आता gas बंद करून लिंबाचा रस, कोथिंबीर आणि लोणी घालून गरमागरम खायला घ्यावी.
Leave a Reply