साहित्य:- मोठा पेरू १ नग, मिक्स फ्रुट जेली अर्धा वाटी, व्हॅनिला कस्टर्ड १ वाटी, मध २ चमचे.
कृती:- व्हॅनिला कस्टर्ड : दोन चमचे कस्टर्ड दोन कप दुधात मिसळून चवीनुसार साखर घालावी व मंद आचेवर घट्ट करून घ्यावे किंवा एका भांडय़ात पाणी गरम करून गॅसवर ठेवावे. त्याच्या आतमध्ये बसणाऱ्या भांडय़ात कस्टर्डचे मिश्रण ठेवून ढवळावे. घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवावे. (याला डबल बॉयलिंग प्रोसेस म्हणतात, यामुळे कस्टर्ड जळत नाही.)
कृती ग्वावाबोट:- पेरूचे लांबट भागाचे मधोमध दोन भाग करून बियांचा भाग काढून टाकावा व पेरूला थोडेसे वाफवून घ्यावे. थंड करून यामध्ये जेली घालून सर्व्हिंग प्लेटमध्ये पहिले कस्टर्ड ओतून त्यावर ही पेरूची फोड ठेवावी. वरून बदाम, पिस्त्याचे काप व मधाने सजवून थंड करून सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२०१७३३
Leave a Reply