साहित्य :- वाटीभर फणसाच्या आठळया , अर्धी वाटी साजूक तूप , वाटीभर साखर ,एक छोटा चमचा वेलदोडयाची पूड ,चिमूटभर जायफळाची पूड ,एक छोटा चमचा मीठ.
कृती :- प्रथम फणसाच्या आठळया बत्याने फोडून घ्या व मिठाच्या पाण्यात घालून मायक्रोवेव्हमधून उकडून घ्या आणि थंड झाल्यावर सोलून घ्या व मिक्सरवर फिरवून घ्या. नंतर गॅसवर एका नॉनस्टिक कढईत साजूक तुपावर खमंग होईतोंवर व सोनेरी रंग येईतोवर परतून घ्या. आता गॅसवर एका भांड्यात वाटीभर साखरेचा दोन तारी पाक करून घ्या,त्या पाकात वेलदोडयाची पूड व जायफळाची चिमूटभर पूड घालून ढवळून घेऊन मग आठल्याचे तुपावर भाजून घेतलेले व मिक्सरमधून फिरवून तयार केलेले आठळ्यांचे पीठ घाला व झार्याेने हलवून /ढवळून घ्या व गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. अर्ध्या तासाने मिश्रण थंड व घट्ट झाल्यावर साजूक तुपाच्या हाताने लाडू वळा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply