साहित्य :- अननसाचा रस एक लिटर, साखर दिड किलो, प्रिझरव्हेटिव्ह अडीच ग्रॅम, सायट्रिक अॅसिड पन्नास ग्रॅम, पाणी सव्वा लिटर, खाण्याचा रंग लेमन येलो, अर्धा लहान चमचा.
कृती :- जाड बुडाच्या भांड्यात पाणी घालून त्यात साखर घाला. उकळत ठेवा. आय मंद ठेवा. हालवून घ्या. साखर विरघळली का ते पाहा. उकळी येऊ लागली की त्यात सायट्रिक अॅसिड टाका. हालवत रहा. साखर पूर्ण विरघळली की हे सिरप स्वच्छ कपड्याने गाळून घ्या. निवल्यानंतर त्यात फळांचा रस, खाण्याचा रंग आणि प्रिझर्व्हेटिव्ह घाला. घुसळून एकजीव करा. तयार मिश्रण स्वच्छ कोरड्या बाटल्यात भरून टेवा. आवश्यकतेनुसार वापरा.
याप्रमाणेच आपण संत्रा, लिंबू याचे स्क्वॅशवरील प्रमाणानुसार करु शकतो.
Leave a Reply