मक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ सापडतं अमेरिकेत. आजही अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात मका पेरला जातो. मक्याची पहिली नोंद ५ नोव्हेंबर १४९२मध्ये सापडते. ख्रिस्तोफर कोलंबसच्या जगाच्या सफरीमध्ये त्याचे स्पेनमधील दोन प्रतिनिधी क्युबाच्या अंतर्भागात पोहोचले. तेव्हा त्यांनी चवदार मका चाखला. मक्याच्या पदार्थाचा उल्लेख त्यांच्या नोंदवहीत सापडतो. अमेरिकेप्रमाणेच कॅनडा आणि चिलीमध्येही मक्याचं अस्तित्व दिसलं. त्यात िफ्लट कॉर्न, फ्लोअर कॉर्न, पॉप कॉर्न या प्रकारांसारख्याच इतरही काही जाती सापडल्या. मक्याच्या शेतीने आíथक स्थर्य मिळाल्यामुळे सांस्कृतिक विकासाकडे लक्ष वळलं व नागरी जनजीवन सुखावलं.
कोवळ्या मक्याची भजी बनवली जातात. मक्यापासूच ढोकळे व वडेही बनवले जातात. पळसाच्या पानावर मक्याच्या पिठापासून बनवलेली भाकरी खूप गोड, स्वादिष्ट व पौष्टिक असते. या भाकरीला पानगी असेही म्हणतात. पंजाबमध्येही मक्याच्या पिठाच्या भाकरी फार प्रसिद्ध आहेत. मक्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तेलाचा अंश असतो. म्हणनूच मक्यापासून तयार केलेल्या पोळ्या खुसखुशीत असतात. आजकाल बऱ्याच कंपन्या मक्याचे तेलसुद्धा काढतात. हे तेल पिवळ्या रंगाचे असते व याला कुठल्याही प्रकारचा विशिष्ट वास नसतो. बेबीकॉर्न, पॉप कॉर्न या मूळ मक्याच्या वाणातून शास्त्रज्ञांनी सुधारित वाण तयार केले. कडक उन्हामुळे मक्याच्या दाण्यांच्या लाह्य़ा झाल्या. बेबीकॉर्न त्यांपैकीच एक. मक्यालची ही कोवळी कणसे चवीला फारच सुंदर लागतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply