पंजाबी गरम मसाला

साहित्य :- 1 टी स्पून धणे, अर्धा टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 4 ते 5 तमालपत्रे, अर्धा टी स्पून दालचिनी, अर्धा टी स्पून काळे मिरे, अर्धा टी स्पून लवंग, 5 मसाला वेलदोडे व पाव जायफळ.

कृती :- जायफळ सोडून सर्व मसाला कोरडाच भाजून घ्या. (फार भाजू नका.) नंतर जायफळासहित मिक्सरवर पूड करून घ्या. टीप – हा मसाला एकदम जास्त प्रमाणात न करता लागेल तसा थोडाच करावा.

Avatar
About खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप 71 Articles
श्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*