साहित्य – दोन वाट्या बारीक रवा, दूध एक वाटी, 1 टेबलस्पून पातळ तूप, 1 वाटी साजूक तूप, दीड वाटी पिठीसाखर, 1 टेबलस्पून वेलदोडे, जायफळ पूड, थोडे बदामाचे पातळ काप, थोडे बेदाणे, केशर, 5-6 मऊ पेढे.
कृती – रव्याला दूध व पातळ तूप चोळून ठेवावे व काही वेळ दडपून ठेवावे. (मोगरी देणे असे या प्रक्रियेस म्हणतात.) मग मिश्रण कोरडेच मिक्सरमधून काढावे. बारीक केलेला रवा साजूक तुपावर मंदाग्नीवर भाजून घ्यावा. नंतर थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर, वेलदोडे पूड, जायफळ पूड, बदामाचे काप, बेदाणे व कुस्करलेले मऊ पेढे घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे. (पेढे ऐच्छिक) झालेल्या मिश्रणाचे लहान लहान लाडू वळावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply