साहित्य :- दोन वाटी वाफवलेला राजमा, दोन चमचे हिरवी मिरची-आले-लसूण पेस्ट, दोन उकडलेले बटाटे, एक चमचा गरम मसाला, एक बारीक चिरलेला कांदा, मीठ, अर्धी वाटी ब्रेडचा चुरा, दोन चमचे आमचूर पावडर, तेल.
कृती :- राजमा मिक्सबरवर ओबडधोबड वाटून घ्या. त्यात मिरची पेस्ट, उकडलेला बटाटा, गरम मसाला, कांदा, आमचूर पावडर, मीठ, कोथिंबीर घालून चांगले एकजीव करा. त्याचे पॅटिस थापून नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूंनी चांगले खरपूस भाजून घ्या. तयार पॅटिस चटणीबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply