साहित्य :
सारण- १ मूठ चिरलेली कोथिंबीर, १ वाटी खवलेले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम बेदाणा, मीठ, साखर.
कव्हरसाठीचे साहित्य – २५० ग्रॅम रताळी, १ मोठा बटाटा, थोडेसे मीठ.
कृती :
रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून पुरणयंत्रातून काढून घ्यावेत. त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे. रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्या ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्याच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात. गरमगरम खायला द्याव्या. फार सुंदर लागतात. उपवासाला एकदम चांगल्या.
Leave a Reply