दीड वाटी रवा
१ वाटी दूध
१ वाटी दही
१ वाटी साखर
४ वेलदोडे (पूड)
४ काजू (पातळ काप)
१० बेदाणे
८-१० चारोळ्या (ऐच्छिक)
अर्धा चमचा बेकिंग सोडा
१ वाटी लोणी किंवा तूप
२-३ थेंब केशर एसेन्स किंवा रंग
पाव चमचा मीठ.
पाककृती
दही व साखर मिसळून घ्यावे. साखर विरघळली की नंतर त्यात दूध, रवा, वेलचीपूड, चारोळी, मीठ, लोणी, रंग व सोडा क्रमाने घालून चांगले मिसळावे. तासभर झाकून ठेवावे. नंतर तुपाचा पातळ हात सारवलेल्या भांड्यात मिश्रण ओतावे. मध्यम गरम ओव्हनमध्ये अर्धा तास हा केक भाजावा. गार झाल्यानंतर खा.
Leave a Reply