साहित्य: १ कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १/४ कप बटर, चवीपुरते मीठ, १/२ टीस्पून जिरे, २ टीस्पून वाटलेली मिरची पेस्ट, तळणीसाठी तेल.
कृती: तांदळाचे पीठ एका खोलगट भांड्यात घ्यावे. लहान पातेल्यात पाणी गरम करावे. त्यात मीठ, जिरे, मिरचीची पेस्ट आणि बटर घालावे. बटर वितळून पाण्याला उकळी येऊ द्यावी. पाणी उकळले कि लगेच तांदळाच्या पिठात घालून चमच्याने मिक्स करावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे. कोमट झाले कि मऊसर मळून घ्यावे. चकली यंत्राला आतून तेलाचा हात लावावा आणि तयार उकड भरून घ्यावी. तळणीसाठी तेल गरम करावे. आच मिडीयम आणि हायच्या बरोबर मधोमध ठेवावी. प्लास्टिकच्या लहान कागदावर चकल्या पाडाव्यात. चकली पाडून झाल्यावर शेवटचे टोक चिकटवून टाकायला विसरू नये. चकल्या बदामी रंगावर तळून घ्याव्यात. तळलेल्या चकल्या पेपर टॉवेलवर काढून ठेवाव्यात म्हणजे अधिकचे तेल टिपून घेतले जाईल. चकल्या पूर्ण गार झाल्या कि डब्यात भरून ठेवाव्यात.
Leave a Reply