तीन लाल भोपळी मिरच्या, तीन मोठे टोमॅटो, एक लहान कांदा, दोन:-तीन लसूण पाकळ्या, एक मोठा चमचा क्रीम, तीन कप व्हेज स्टॉक, एक चमचा लिंबाची किसलेली साल, एक मोठा चमचा लिंबाचा रस, मीठ, मिरपूड.
कृती:- ओव्हन २०० सेल्सिअसवर तापवून त्यात मिरच्या, लसूण, कांदा व टोमॅटो २० ते २५ मिनिटे भाजून घ्यावे. काळी झालेली साल काढून गार झाल्यावर मिक्सनरमध्ये पेस्ट करावी. गाळण्याने गाळून घ्यावी.
त्यात व्हेज स्टॉक, लिंबाची साल घालून ५ ते १० मिनिटे उकळावे. चवीला मीठ, मिरपूड, लिंबाचा रस व क्रीम घालून गरम गरम प्यायला द्यावे. आवडत असल्यास उकळताना उकडलेला पास्ता घालावा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply