साहित्य :- साखर पाऊण किलोला थोडी कमी, पाणी पाव लिटर पेक्षा थोडे जास्त, थोडा खाण्याचा गुलाबी लालसर रंग, रोझ इसेन्स सात थेंब, थोडा चांदीचा वर्ख
कृती :- मंद आचेवर पातेल्यात साखर पाणी एकत्र करुन ठेवा. सतत हालवत राहा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर स्वच्छ फडक्याने मिश्रण गाळून घ्या. शुगर सिरप तयार होईल. तो थंड झाल्यावर त्यात खाण्याचा रंग आणि इसेन्स टाकून हालवून घ्या. चांदीचा वर्ख चुरडून त्याच्या लहानसर गोळ्या करून त्यात टाका. मिसळून घ्या. नंतर बाटल्यात भरून ठेवा.
Leave a Reply