सॅलडची कोशिंबीर

साहित्य : सॅलडची पाने, कांदा, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ.

कृती : सर्वप्रथम सॅलडची पाने मिठाच्या पाण्यानी धुवून घेणे. कोरडी झाल्यावर (वाळल्यावर) बारिक चिरणे. नंतर त्यात कांदा चिरुन घालणे. त्यात दाण्याचे कुट, साखर, मीठ व लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे. त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे. मोहरी तडतडल्यावर हिंग घालून गॅस बंद करणे. व ही फोडणी सॅलॅडवर ओतून हवा असल्यास नारळाचा चव घालून ढवळणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*