आजचा विषय श्रावण घेवडा

श्रावण घेवडय़ालाच फ्रेंच बीन्स किंवा फरस बी म्हणतात. हा ‘ग्रीन बीन्स’ ह्य़ा प्रकारात मोडतो. ह्य़ाशिवाय स्ट्रींग किंवा स्नॅप बीन्स आणि रर्न बीन्सही ग्रीन बीन्सचेच प्रकार आहेत.. ही भाजी स्थूल व्यक्तींना व स्थूलतेशी निगडित समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम असते. यातील तंतुचे प्रमाण खूप नगण्य असल्यामुळे जुना मलावरोधाचा त्रास असणाऱ्यांनी आहारात श्रावण घेवड्याचा समावेश करावा. घेवड्यातील तंतू हे कर्करोग निर्माण करणारे घटक व विषद्रव्ये (toxic substances) यांपासून मोठ्या आतड्याच्या आतील अस्तराला संरक्षण मिळवून देतात. श्रावण घेवड्यासारख्या शेंगभाज्यांमधील तंतू हे रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा कमी करतात, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
यातील “ब’, “क’ व बीटाकेरोटीन या जीवनसत्वांमुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती सक्षम होते; तसेच पेशींचा दाह कमी करणारे घटक, (free radicals)यांनाही अटकाव होण्यास मदत होते. ताज्या घेवड्यातील फॉलिक ऍसिड हे गर्भवती स्त्रियांसाठी बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे. श्रावणघेवड्यातील मॅंगनिज हे फ्री रॅडिकल्स कमी करण्यात मदत करते, तर पोटॅशियम हे हृदयाची गती व रक्तदाब नियंत्रणात उपयोगी ठरते. श्रावण घेवड्यात ल्युटिन (lutine) व झियाझेनेथिन (zeaxanthin) हे घटक आहेत. श्रावणघेवड्यातील तंतू जेवणानंतरची रक्तशर्करा वाढू देत नाहीत. त्यामुळे मधुमेहींनी ही भाजी खावी. अत्यंत कमी उष्मांक व नगण्य चरबी असलेली श्रावण घेवडा ही भाजी आहे. एक वाटी शिजवलेल्या भाजीत फक्त ३१ उष्मांक आणि १.१ ग्रॅम फॅट्‌स असतात.श्रावण घेवड्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्त्वे व क्षार असतात.श्रावणघेवडा हा मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्थौल्य, पक्षाघात, हायकोलेस्टेरॉल, मलावरोध, आतड्याचा कॅन्सर, गर्भदोष व वयस्कर लोकांमधील अंधत्व अशा अनेक विकारांपासून संरक्षण देतो.प्रतिकारशक्ती वाढविणारे व वय:स्थापन करणारे घटक या भाजीत आहेत.घेवड्याची शेंग विकत घेताना ती कोवळी असल्याची खात्री करून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*