साहित्य –शेवया १ वाटी (काही लोकं हाताने किंवा मशीनने घरी पण शेवया करतात. कुठल्याही शेवया वापरल्या तरी चालतील.), मूगाची दाळ ३/४ वाटी,हिरव्या मिरच्या २-३, कांदा १ बारीक चिरलेला, कोथिंबीर सजावटीसाठी, मीठ चवीनुसार, तूप २ टेबलस्पून, तेल १ टेबलस्पून,फोडणीसाठी मोहरी, जिरं, हिंग व हळद, गरम पाणी.
कृती:- पाणी ऊकळायला ठेवावे. सर्वप्रथम मूगाची दाळ स्वच्छ धुवून दूप्पट पाण्यात अर्धा तास भिजत घालावी. कढईत तूप गरम करून त्यात शेवया टाकाव्या व मध्यम आचेवर लालसर रंगावर खमंग भाजून घ्याव्या. भाजलेल्या शेवया एकीकडे काढून ठेवाव्या व त्याच कढईत तेल गरम करावे. तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरं, हिंग व हळद क्रमाने टाकावे. मग हिरव्या मिरचीचे तूकडे टाकावे. मिरची खमंग तळली गेल्यावर कांदा टाकावा व फक्त रंग बदलेपर्यंत परतून घ्यावा. त्यात आधी भाजून ठेवलेल्या शेवया टाकाव्या व भिजलेली मुगाची दाळ टाकावी. चवीप्रमाणे मीठ टाकावे व चांगले हलवून घ्यावे. ऊकळते पाणी फोडणी दिलेल्या शेवयांमध्ये टाकावे.साधारणपणे सर्व शेवया बुडून दोन बोटं पाणी वर शिल्लक राहील एवढे पाणी टाकावे. गॅस बारीक करून दोन मिनीटे हे मिश्रण ऊकळू द्यावे व आळून आल्यावर कडेने तूप सोडून मंद आचेवर दणदणीत वाफ येऊ द्यावी. या वाफेवरच मुगाची दाळ शिजायला हवी. गॅस मोठा करून खिचडी वाफवली तर दाळ कच्ची राहते व खाताना दाताखाली येते. गरमागरम खिचडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून लगेच सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply