शेवग्याच्या पानांचे सूप (मशिंगापत्री सूप)
हे सूप साऊथ इंडिया मध्ये करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त
साहित्य : शेवग्याच्या झाडाची पाने- २ वाटय़ा, शेवगा शेंगेतले दाणे- अर्धा वाटी, लिंबू, मीठ, साखर- चवीनुसार, काळी मिरी पावडर
कृती : शेवग्याची पाने सात वाटय़ा पाणी घेऊन उकळावे. गाळून घ्यावे. पाणी थोडंसं आटल्यावर त्यात शेवग्याच्या बिया टाकून त्यासुद्धा उकळाव्यात. चवीनुसार मीठ, साखर, लिंबू घालून वरून क्रीम घालून सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
शेवगा पानाच्या वड्या
साहित्य:- शेवग्याचा पाला, हरभरा डाळीचे पीठ, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद, तेल, दही इ.
कृती:- शेवगा पाला, बेसन, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद व तेल एकत्र करावे. दही घालून भिजवून तेलाचा हात लावलेल्या थाळीत थापावे. कुकरमध्ये वाफवून वड्या थंड करून कापाव्यात किंवा तव्यात तेल घालून तळाव्यात किंवा फोडणीत परताव्यात. वरून खोबरे, कोथिंबीर टाकावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
शेवगा पानांची टिक्की
साहित्य:- शेवग्याची पाने (ताजी फुले मिळाल्यास घालावीत) तांदूळ पीठ, चणाडाळीचे पीठ, तिखट, हळद, गरम मसाला, नारळाचे बारीक काप, काजूचे कूट, मीठ, चिंच, तेल, रवा इ.
कृती:- चिंच पाण्यात भिजवावी. तेल वगळून इतर साहित्य एकत्र भिजवावे. पीठ खूप घट्ट वा पातळ नको, अशा अंदाजाने तांदूळ पीठ व बेसन घालावे. चपट्या टिक्क्या रव्यात घोळवून शॅलो फ्राय कराव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply