हे सूप साऊथ इंडिया मध्ये करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त
साहित्य : शेवग्याच्या झाडाची पाने- २ वाटय़ा, शेवगा शेंगेतले दाणे- अर्धा वाटी, लिंबू, मीठ, साखर- चवीनुसार, काळी मिरी पावडर.
कृती : शेवग्याची पाने सात वाटय़ा पाणी घेऊन उकळावे. गाळून घ्यावे. पाणी थोडंसं आटल्यावर त्यात शेवग्याच्या बिया टाकून त्यासुद्धा उकळाव्यात. चवीनुसार मीठ, साखर, लिंबू घालून वरून क्रीम घालून सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply