आपल्याकडे अनेकदा रात्रीच्या जेवणानंतर कधी चपात्या शिल्लक रहातात तर कधी भात आणि कधीतरी भाजीसुद्धा. या उरलेल्या अन्नाला थोडं नवीन रुप दिलं तर?
तसाही आता सगळीकडे रिसायकलींगचा बोलबाला आहेच. शिळ्या अन्नाचं रिसायकलींग करुन काही खास पाककृती कशा करता येतील ते बघूया ! फडणीचा भात आपण काल्ला असेलच. त्याच धर्तीवर ही फोडणीची चपाती आपण बनवूया फक्त १० मिनिटात. याला शिळ्या चपात्यांचा शिरा असे सुद्धा म्हणता येईल.
साहित्य :
शिळ्या चपात्या – पाच-सहा
मोठा कांदा – एक
हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
मीठ
मोहरी
तेल
कृती :
कांदा बारीक चिरुन घ्या. कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.
शिळ्या चपात्यांचे बारीक तुकडे करुन घ्या किंवा त्यांना हाताने अथवा मिक्सरवर कुस्करुन घ्या.
कढईत थोडं तेल सोडा. मोहरी आणि मिरच्या तळून घ्या. बारीक चिरलेला कांदा लाल होई्तोवर तळून घ्या.
आता तुकडे केलेल्या / कुस्करलेल्या चपात्या कढईत घाला. मीठ घाला. चांगले खरपूस होऊ द्या. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
मस्तपैकी फोडणीची चपाती तयार !
Leave a Reply