साहित्य:- अर्धा किलो कोवळा हिरवा घेवडा, १ डावभर तेल, फोडणीचे साहित्य, ५-६ हिरव्या मिरच्या, १ इंच आले वाटून, ३-४ लसून पाकळया मीठ, साखर चवीनुसार, अर्धावाटी खवलेले नारळ, थोडी चिरलेली कोथिंबीर
कृती:-श्रावण घेवडा दोन्ही बाजूने डेंख व शिरा काढून अगदी बारीक चिरावा व चिमूटभर सोडयाच्या पाण्यात स्वच्छ धुऊन चाळणीत निथळात ठेवावा. जाड बूडाच्या पातेल्यात मोहरी, हिंग व थोडी हळद घालून फोडणी करावी. चिरलेला श्रावण घेवडा टाकावा. वरतूनच पाण्याचे झाकण ठेवून भाजी वाफवून घ्यावी वाटलेली मिरची व आले, लसून घालावे, भाजी शिजल्यावर मीठ, साखर, ओला नारळ व कोथिंबीर घालून भाजी सुकी परतून उतरवावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply