साहित्य:- श्रावण घेवडा चिरून साधारण ३ वाट्या, १ मध्यम आकाराचा बटाटा, एक टोमॅटो, अर्धा चमचा हळद
२ चमचे गोड मसाला, धणे जीरे पावडर प्रत्येकी १ चमचा, ७ ते ८ कढीपत्ते, १/४ वाटी खोबरं, ४ चमचे दाण्याचे कूट, गूळ अर्धा चमचा, फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी व जीरे.
कृती:- ही भाजी आपण थेट कुकर मधेच करणार आहोत. त्यासाठी कुकर मध्यम आचेवर गरम करून घ्यावा. त्यात फोडणीसाठी २ चमचे तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी व जीरं घालावा. दोन्ही तडतडले की मग त्यात चिमूटभर हिंग घालावे. कढीपत्ता घालावा. त्यानंतर सर्व मसाले घालून मिनिटभर परतावे. लगेचच चिरलेला घेवडा, चिरलेला बटाटा व टोमॅटो घालावा. थोडावेळ परतावे. अर्धी ते पाउण वाटी पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून भाजी ढवळावी व कुकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या करून घ्याव्यात. {आपल्या कुकर नुसार शिट्ट्यांचा अंदाज घ्यावा.} कुकरचे झाकण पडले की भाजी छान ढवळून serving bowl मध्ये काढावी व कोथिंबीर पसरून गरम गरम वाढावी. ही भाजी पोळी व भातासोबातही छान लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply