गाजराची चटणी
साहित्य:- अर्धा किलो गाजराचा कीस, दीड कप साखर, अर्धा कप व्हाइट व्हिनेगर, प्रत्येकी दीड चमचा आलं व लसणाची पेस्ट, २ चमचे लाल तिखट, १ च. जिरेपूड,
कृती:- गाजरे स्वच्छ धुऊन साफ करून, किसून घ्या व अर्धा तास ताटात पसरून उन्हात ठेवा. साखर व व्हिनेगर एकत्र उकळा. आल्या-लसणाची पेस्ट पातळ फडक्याात बांधून, पिळून रस काढून घ्या व पाकात घाला. गाजराचा कीस घाला. चवीनुसार मीठ, तिखट, जिरेपूड, आवडत असल्यास 2 चमचे गरम मसाला घाला. धुऊन, पुसून बेदाणे घाला. पाक छुंद्यासारखा घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. दोन दिवस मुरू द्या. मग ब्रेडच्या स्लाइसला लावून सॅण्डविच बनवा किंवा पराठ्यांबरोबर द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गाजराचे सांडगे
साहित्य:- ५ गाजरांचा जाड कीस, अर्धा कप धने, थोडे तीळ, ४-५ हिरव्या मिरच्या चिरून, मीठ, तिखट, लागतील तसे पोहे, हिंगपूड.
कृती:- गाजराच्या किसात मीठ, तिखट इ. घाला. त्यामुळे गाजराला थोडे पाणी सुटेल. मग लागतील तसे पोहे मिसळा. ताटाला तेलाचा हात लावून सोंगटीच्या आकाराचे सांडगे बनवा. एका बाजूने सुकले की उलटवा. चांगले वाळवा. तळून खिचडीबरोबर वाढा.
टीप : सांडगे हलक्याा हाताने, जास्त घट्ट न दाबता बनवा, म्हणजे आतपर्यंत तळले जातील.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गाजराचे खमंग वडे
साहित्य :-२ गाजरे, १ छोटा तुकडा कोबी, ३ हिरव्या मिरच्या, १ तुकडा आले, १ कांदा, कोथिंबीर, २ टे. स्पून चण्याची डाळ, १ टे. स्पून उडदाची डाळ, ३ टे. स्पून कणीक किंवा मैदा, थोडे ताक, हिंग.
कृती:- गाजरे व कोबी किंचित वाफवा. गार झाल्यावर हाताने मोडून घ्या. लगदा करू नका. दोन्ही डाळी १ तास भिजवा. वाटताना मिरच्या व आले वाटा. भाज्या, वाटलेली डाळ, हिंग, मीठ, कणीक, कांदा घालून पीठ भिजवा. थोडे ताक घाला. प्लॅस्टिकवर थापून छोटे छोटे वडे बनवा. तळून घ्या. पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला द्या. टीप:- आवडीनुसार तांदळाची पिठी, कढीलिंब चिरून घालू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गाजर आलू मटर
साहित्य:- ३ गाजरे, २ बटाटे, १ कप मटारचे दाणे, तूप, जिरे, हिंग, तिखट, मीठ, हळद, धनेपूड, आमचूर, पादेलोण, गरम मसाला.
कृती:- गाजर, बटाटे धुऊन चिरून घ्या. तूप, जिरे, हिंग, हळद, तिखट, धनेपूड घाला. (तूप तापल्यावर गॅस बंद करा.) १ टेबलस्पून पाणी घाला. गाजर, मटार , बटाटा घाला. थोडे पाणी घालून भाज्या शिजू द्या. मग आमचूर, पादेलोण, गरम मसाला थोडा थोडा घाला. वाढण्यापूर्वी कोथिंबीर व लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या पेरा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गाजराच्या वड्या
साहित्य:- १ कपभर साईसकट दूध, १ कप साखर, सव्वा कप गाजराचा कीस (घट्ट दाबून पाणी काढून घ्या), २ च. साजूक तूप, बदामाचे काप, वेलदोडे पूड अर्धा चमचा.
कृती:- दूध, साखर, गाजराचा कीस नॉनस्टिक पॅनमध्ये शिजत ठेवा. घट्ट होत आले की तूप घाला. ट्रेला तूप लावून थापा. वेलदोडे पूड, बदाम काप पेरा. जरा गार झाल्यावर तुकडे करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गाजराची पानगी
साहित्य- एक वाटी गाजराचा कीस, १/२ वाटी तांदळाचं पीठ, १ मोठा चमचा बारीक रवा, १/२ वाटी दही, पाव वाटी गूळ, चवीला मीठ, चिमूटभर जायफळ, चिमूटभर बेकिंग पावडर आणि १ चमचा तूप.
कृती- सर्व साहित्य एकत्र करून सैलसर पीठ भिजवावं. केळीच्या पानाच्या एका तुकडय़ाला तूप लावून तो तापलेल्या तव्यावर ठेवावा. त्यावर दोन मोठे चमचे पीठ पसरावं. वर केळीचं पान ठेवावं, खालचं पान भाजलं गेलं की उलटावं म्हणजे दुसरी बाजू भाजली जाईल.
गाजराऐवजी केळ्याचा गर, काकडीचा, भोपळ्याचा कीस घालता येईल. आणि खमंग पानगे खाता येतील.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply