साहित्य:- १ टोमॅटो ,१ हिरवी मिरची आणि १ तुकडा आले, बारीक चिरलेली कोथिंबीर, १०० ग्रम मटार, २०० ग्रम सोया चंक्स, जीरे, हिंग , हळद पावडर , धने पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, तेल, मीठ.
कृती:- टोमॅटो , हिरवी मिरची आणि आल स्वच्छ धुवून मिक्सर मध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्या.
सोया चंक्सचे तुकडे करून घ्या. पॅन मध्ये तेल घालून गरम करुन घ्या. गरम तेलात तुकडे केलेले सोयाबीन चंक्स घाला. सोया चंक्स मध्यम आचेवर ब्राउन होई पर्यंत परता. सोया चंक्स चांगले परतून झाल्यावर १ कप पाणी घाला. पॅन वर झाकण ठेवून मंद आचेवर चंक्स शिजू द्या. दुसऱ्या पॅन मध्ये उरलेले तेल घालून गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे घालून परता.
जीरे परतल्यावर मग हिंग , हळद पावडर , धने पावडर घालून हलक परता. आता टोमॅटो , मिरची आणि आल्याची तयार केलेली पेस्ट, लाल मिरची पावडर घालून तेलाचा तवंग येईपर्यन्त परता.
दुसऱ्या पॅन मध्ये शिजत ठेवलेले सोया चंक्स मध्ये मध्ये तपासत रहा.सोया चंक्स मधील पाणी आटे पर्यंत आणि चंक्स मऊ होई पर्यंत शिजवा. मसाला चांगला परतून झाल्यावर त्यात मटार दाणे, गरम मसाला आणि मीठ घालून मसाला मिनीट भर एकजीव करा. मग त्यात १/२ कप पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. थोड्या वेळानंतर तपासून पहा. मटर चेक करून पहा. जर शिजले असतील तर सहज दाबले जातील. शिजलेले सोया चंक्स मटर मसाल्यात घालून नीट एकत्र करा.
झाकण ठेवून २ मिनीटे भाजी शिजू द्या. भाजी शिजल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
Leave a Reply