पनीर बनविण्यासाठी एक लिटर सोया दूध थोडे गरम करून त्यामध्ये 1.5 ते 2 ग्रॅम सायट्रीक ऍसिड किंवा 1.5 ते 2 ग्रॅम कॅल्शियम सल्फेट किंवा 1.5 ते 2 ग्रॅम मॅग्नेशियम क्लोनराईड मिसळावे. त्यामुळे दूध फाटते. या फाटलेल्या दुधात प्रथिने व पाणी वेगवेगळे स्पष्ट दिसते. या द्रावणाला मसलिन कपड्यांद्वारे गाळावे. कपड्यावरील घन पदार्थास प्रेस यंत्रामध्ये 30 मिनिटे दाबून ठेवावे. प्रेसमध्ये कमी अधिक दाब देऊन मुलायम किंवा घट्ट पनीर तयार करता येते. अशा प्रकारे तयार झालेल्या सोया पनीरच्या 100 ते 200 ग्रॅम वजनाच्या वड्या करून त्या थंड पाण्यात ठेवाव्यात. पनीर ठेवलेले थंड पाणी नियमितपणे बदलून सामान्य तापमानामध्ये तीन दिवस तर फ्रिजमध्ये 8 ते 10 दिवस टिकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply