सोयाबीन हे डाळवर्गीय पीक मूळचे चीन देशातले. चिनी लोक आपल्या रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करतात. महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक लाखो शेतकरी घेतात. हे पीक दलालांमार्फत तेलगिरण्यांना जाते. तेथे त्यापासून खाद्यतेल व पेंड मिळते. पेंडीचा उपयोग कोंबडय़ांचे खाद्य म्हणून होतो. सोयाबीनपासून दुधाला पर्याय असे दूध बनवता येते. हे दूध गार किंवा गरम पिता येते. कॉफी, चॉकलेटसाठीही ते अप्रतिम आहे. त्यापासून ताक, दही, लस्सी, योगर्ट, मिल्कशेक, आइस्क्रिम बनवता येते.
सोया दुधापासून बनवलेल्या पनीरला ‘टोफू’ म्हणतात. चायनीज खाद्यात टोफूचा वापर सर्रास केलेला असतो. पनीर घालून केलेले सर्व पदार्थ टोफू वापरून करता येतात. मांसाहारी पदार्थामध्ये टोफू वापरून त्यांना शाकाहारी पर्याय देता येतो. दिल्लीमधली ‘वाह जी वाह’ ही अन्न साखळी टोफूचे विविध पदार्थ पुरवते. सोयाबीनपासून दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने (उदा. ब्रेड, बिस्किटे) व डाळीचे पदार्थ (उदा. नमकीन) बनवता येते. एवढेच नव्हे, तर आपल्या आहारातले बहुतेक पदार्थ सोया वापरून बनवता येतात. हल्ली अनेक महिला गव्हाचे दळण देताना त्यात तीस टक्के सोयाबीन मिसळतात. सोयाबीनपासून कॉफी, फुटाणे, चकली, शेव, चटणी असे अनेक पदार्थ बनवता येतात.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
सोया दूध बनविणे
सोयाबीन स्वच्छ करून पाण्यात ४ ते ६ तास पाण्यात एक तास भिजवावे. त्यानंतर सोयाबीनची साले हातावर रगडून काढून टाकावीत. पूर्णपणे भिजलेले आणि साल काढलेल्या सोयाबीनच्या सहा पटीत पाणी घेऊन कुकर ग्राईंडर या यंत्रात मिसळावे. त्यानंतर १५ ते २० मिनिटे दळावे.
या दरम्यान कुकर ग्राईंडर यंत्र वापरण्यापूर्वी व वापरतांना यामध्ये बॉईलरमधून वाफ सोडावी.
दळलेले मिश्रण ग्राईंडरला असलेल्या तोटीद्वारे दुसऱ्या टाकीमध्ये घ्यावे. नंतर हे मिश्रण मसलिन कापडामधून गाळावे. त्यानंतर प्रेसिंग मशिनमध्ये दाबून सोयाबिनचा चोथा आणि दूध वेगळे करावे.
या दुधात चवीनुसार साखर, विलायची, केशर मिसळून सुगंधित दूध तयार करता येते.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
Leave a Reply