साहित्य:- दोन वाट्या सोयाबीन पीठ, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, धने, जिरेपूड, हळद, लाल तिखट, तीळ ,कांदा, कोथिंबीर, अर्धा लिंबू, थोडेसे हिंग, तेल.
कृती -: प्रथम सर्व पीठ एकत्रित करून, एक पळी गरम तेलाचे मोहन करावे. धने,जिरे पावडर, तिखट किंचित हळद,चवी नुसार मीठ, तीळ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर व लिंबूरस पिळावा. हे सर्व पिठात घालून कोमट पाण्याने घट्ट भिजवावे. अर्धातास मूरत ठेवल्या नंतर तेलाच्या हाताने पीठ थोडे थोडे मळावे. त्याचे प्लास्टिक च्या कागदावर थापून थोडे चापटसर वडे बनवावेत, हे वडे मध्यम आचेवर तळावे. गरमागरम वडे फार चविदार लागतात.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
Leave a Reply