साहित्य: २ कप किसलेली कोबी, २-३ चमचे शेंगदाणा कूट, २ चमचे तेल, १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा लिंबाचा रस, १/२ चमचा साखर, चवीपुरते मिठ, १/४ कप चिरलेली कोथिंबीर.
कृती: एका वाडग्यात किसलेली कोबी घ्यावी. लहान कढल्यात २ चमचे तेल गरम करावे. तेलात जिरे, हिंग, हळद आणि मिरचीचे तुकडे फोडणीस घालावे. हि फोडणी किसलेल्या कोबीत घालावी. शेंगदाण्याचा कूट, चवीपुरते मिठ, साखर, लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर किसलेल्या कोबीत घालावे व नीट मिक्स करावे. हि पचडी तोंडीलावणी म्हणून छान लागते तसेच पोळीबरोबरही खायला छान लागते.
Leave a Reply