साहित्य : सहा नग ब्राऊन ब्रेडचे (गव्हाचा पाव) स्लाइस,एक वाटी मोड आणून वाफवलेले मूग,हरभरे,सोयाबीन ई. ,दोन उकडलेले बटाटे, दोन कांद्याच्या गोल कापलेल्या चकत्या , टोमॅटोच्या गोल कापलेल्या चकत्या,दोन बारीक चिरलेले कांदे,दोन बारीक चिरलेले टोमॅटो,दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,एक चमचा आले-लसणाची पेस्ट,एक चमचा प्रत्येकी धने-जिरे पावडर, एक छोटा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी अमूलचे बटर.
कृती : गॅसवर एका फ्राय पॅन मध्ये अमूल बटर गरम करा. त्यात प्रथम कांदा परतून घ्या,मग आले-लसणाची पेस्ट घालून परतून घ्या. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची ,धने-जिरे पूड,हळद,चाट मसाला व काली मिरे पूड घालून परता. आता बारीक चिरलेले टोमॅटो,चवीनुसार मीठ,मोड आणून वाफावलेली मूग,हरभरा व सोयाबीन ई. व मॅश करून उकडलेले बटाटे घालून उलथण्याने ढवळून चांगले मिक्स करून घ्या व मंद आंचेवर ४-५ मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा.
आता एकेक ब्राऊन ब्रेड स्लाइस घेऊन त्यास सुरीने अमूलचे बटर लावून घ्या व त्यावर प्रथम मोड आणून वाफावलेले स्पाऊटस् पसरा ,मग त्यावर कांदा व टोमॅटोचे काप ठेवा. दुसर्याो स्लाइसळा अमूल बटर लावून तो वर पालथा ठेवा. आशा रीतीने स्प्राऊटस् व कांदा-टोमॅटोचे काप यांचे मिश्रण ठेवलेले स्लाइस तयार करा. हे स्लाइस आता टोस्टर मध्ये ठेऊन भाजून घ्या किंववा ग्रिल करून घ्या.
गरमागरम स्प्राऊट सॅंडविच टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply