साहित्य : आवरणासाठी. दीड कप गव्हाचे पीठ, दीड कप मैदा, १ टेबलस्पून तेल, मीठ चवीपुरते.
सारणासाठी : २ कप रवा (बारीक), १०-१२ ताज्या स्ट्रॉबेरी (तुकडे करून) २ टेबलस्पून तूप, दीड कप साखर, २ कप दूध, २ कप पाणी, १ टेबलस्पून वेलचीपूड. साजूक तूप पोळीला वरतून लावण्यासाठी.
कृती : आवरणासाठी गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, गरम तेल मिक्सच करून थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. त्याचे एकसारखे गोळे बनवावेत.
सारणासाठी : कढईमध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे घेऊन एक मिनिट परतून घ्यावे. मग त्यामध्ये दोन टेबलस्पून पाणी घालून परत एक मिनिट शिजवून घ्यावे व बाजूला काढून ठेवावे. कढईमध्ये तूप गरम करून रवा घालून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घ्यावा. मग कढईमध्ये दूध व पाणी गरम करून त्यामध्ये भाजलेला रवा घालूनमंद विस्तवावर पाच मिनिटे शिजवून घ्यावा. मग त्यामध्ये साखर, वेलचीपूड, शिजवलेल्या स्ट्रॉबेरी घालून मिक्स करून पाच मिनिटे शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर त्याचे भाग करून घ्यावेत. पुरणपोळी बनवताना एक पिठाचा गोळा घेऊन पुरीसारखा लाटून घ्यावा. मग त्यामध्ये सारणाचा एक भाग ठेवून पुरी बंद करून लाटून घ्यावी. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर पोळी छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावी. अशा सर्व पोळ्या बनवून घ्याव्यात. स्ट्रॉबेरी पुरणपोळी सर्व्ह करताना तूप घालून गरम गरम सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply