साहित्य: ५०० ग्रॅम स्ट्रॉबेरीज, तीन मोठे चमचे शेवया, तीन चमचे साखर, एक चमचा तूप, एक कप पाणी, एक कप दूध, दोन वाट्या व्हिप्ड क्रीम, तीन मोठे चमचे स्ट्रॉबेरी जॅम, ड्रायफ्रूट्स चे काप
कृती: प्रथम शेवया, एक चमचा तुपावर हलक्या तांबूस भाजून घ्याव्यात. त्यात एक कप पाणी घालून त्या शिजवून घ्याव्यात. शिजवताना त्यात साखर घालावी. हे मिश्रण गार करायला ठेवून द्यावे.
स्ट्रॉबेरीज चे अर्धे काप करून फ़्रीज मधे ठेवावेत. व्हिप्ड क्रीम, जॅम आणि दूध एकत्र मिक्सर मधून फिरवून घ्यावे व फ़्रीज मधे सेट होण्यास ठेवावे. सर्व्ह करतेवेळी सर्व पदार्थ फ़्रीजमधून काढावेत. एका ग्लासमधे सर्वात तळाला शेवया घालून त्यावर क्रीम, मधे स्ट्रॉबेरीचे काप, त्यावर पुन्हा क्रीम, आणि सर्वात वरती ड्रायफ्रूट्स चे काप घालून थंडगार सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply