साहित्य: २ हॉटडॉग ब्रेड, १ मध्यम कांदा, स्लाइस करून ,१ मध्यम टॉमेटो, गोल चकत्या, १ मध्यम हिरवी भोपळी मिरची, स्लाइसेस, १ लहान लाल भोपळी मिरची, स्लाइसेस, लेटय़ुस, लांब पातळ चिरून, २ ते ३ चीज स्लाइस, २ चमचे मेयॉनिज, ५-६ पिकल्ड अलापिनो पेपर्स स्लाइसेस, मीठ आणि मिरपूड चवीनुसार.
कृती:- ब्रेडला आडवी चीर द्यावी जेणेकरून त्यात भाज्या भरता येतील. ब्रेड उघडून आतमध्ये चीजचे स्लाइस ठेवावे. नंतर ओव्हनमध्ये ग्रील करून चीज थोडे मेल्ट होऊ द्यावे. ग्रील केलेल्या ब्रेडमध्ये कांदा, टॉमेटो, हिरवी आणि लाल भोपळी मिरची, लेटय़ुस, अलपिनो पेपर्स आणि मेयॉनिज घालावे. मीठ आणि मिरपूड भुरभुरावी.
लगेच सव्र्ह करावे.
टीप:- यामध्ये आवडीनुसार भाज्या घालू शकतो. तसेच सँडविचसाठी स्पेशल सॉस मिळतात तेही वापरू शकतो उदा. स्वीट ओनियन सॉस वरील सॅँडविचबरोबर खूप छान लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply