साहित्य :- अर्धा कप तूप, 1 कप कणीक, अर्धा कप मऊ गूळ (खसखस, बडीशेप वर पेरण्यासाठी)
कृती :- तुपावर कणीक खमंग भाजावी. गॅस बंद करून गूळ घालावा. एकजीव झाल्यावर खसखस बडीशेप पेरून थापावं, कापावं. तिखट पदार्थ (देशी – विदेशी) खमीरी रोटी कणकेच्या घरगुती केकमध्ये दिल्याप्रमाणे, कणीक आंबवून घ्यावी. दुसऱ्या दिवशी त्यात थोडा ओवा किंवा वाटलेला लसूण घालून जाडसर रोटी बनवून तंदूर किंवा ओव्हनमध्ये भाजावी. बटर लावून छोल्याबरोबर खायला द्यावी. ही रोटी पौष्टिक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply