सुके अंजीर दररोज खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गळ्याला सूज आली असेल तर सुके अंजीर पाण्यात उकळून ते बारीक करून खावेत, फायदा होतो. दोन अंजीर मधोमध कापून ते एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवावेत आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यायल्याने रक्तसंचार वाढतो.
मधुमेह असणा-यांना अंजीर उपयुक्त आहे. पण सुके अंजीर हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावं.
कमरेचा ज्यांना वारंवार त्रास होतो अशांनी सूंठ, अंजीराची साल आणि कोथिंबीर याचं सारखं प्रमाण घेऊन ते पाण्यात भिजवून ठेवावं. नंतर ते बारीक वाटून घ्यावं. सकाळी हे पाणी गाळून प्यावं. त्याने कमरेचा त्रास कमी होतो. अंजीरमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असल्याने त्याचं सेवन नियमित केलं तर वजन कमी होण्यास मदत होते. कर्करोग होऊ नये म्हणून अंजीर खावं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply