साहित्य:- ३ कप कुरमुरे, १ मोठा कांदा, बारीक चिरलेला, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरलेली, २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून, २ टेस्पून कैरीचे बारीक तुकडे, १/४ कप तळलेले शेंगदाणे, ३/४ कप फरसाण, १/४ कप बारीक शेव, १/२ लिंबाचा रस, चवीपुरते मिठ, १/२ टिस्पून चाट मसाला (ऐच्छिक)
१/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो
कृती:- कुरमुरे २, ४ मिनीटे मध्यम आचेवर सुकेच परतून घ्यावे म्हणजे कुरकूरीत होतील. परतताना चमच्याने ढवळत राहावे म्हणजे कुरमूरे जळणार नाहीत. परतलेले कुरमूरे मोठ्या परातीत काढावे.
कुरमूरे थोडे गार झाले कि आधी त्यात सुके पदार्थ घालावेत. चवीपुरते मिठ, फरसाण, तळलेले शेंगदाणे आणि शेव घालून मिक्स करावे. नंतर मिरच्या, कैरी, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करावे. खुप जास्त वेळ मिक्स करू नये. लगेच सर्व्ह करावे. भेळ तयार केल्यावर लगेच खावी. भेळ तयार करून ठेवल्यास ती नरम पडेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply