सुरणाची साले काढून मोठाले तुकडे करावेत आणि कोकम व पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवावेत. ते थंड झाल्यावर हाताने चांगले स्मॅश करावेत. त्यात मीठ, साखर, ओले खोबरे, हिरव्या मिरचीचे व कोथिंबीरीचे वाटण, रंगाला लाल तिखट व कणिक (आटा-गव्हाचे पीठ) घालून चांगले मळावे. आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोलाकार, चपटे कटलेटस् तयार करावेत. तव्यावर बेताचे तेल टाकून प्रत्येक कटलेट पिठात घोळवून तेलात नीट लावावा. सर्व कटलेटस् मंदाग्निवर खरपूस फ्राय करावेत. गरम गरम कटलेटस् टोमॅटो सॉस वा चिंच-गुळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply