साहित्य – अर्धी वाटी मक्याचे कोवळे दाणे, एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, एक मोठा चमचा तिळकूट, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, तीन-चार डाव कणीक, (कणीक लागेल तशी घ्यावी), एक वाटी तेल.
कृती – बटाटा किसून घ्यावा. कणसाचे दाणे अगदी मऊ वाटावेत. मग दोन्ही एकत्र करून त्यात तिळकूट, तिखट, मीठ व तेलाचे मोहन घालून या मिश्रणात मावेल तेवढी कणीक घालून मध्यम आकाराचे पराठे करावेत. दोन्ही बाजूंनी तेल सोडावे. तांबूस भाजावेत. लोणी वा तूप आणि आंब्याच्या लोणच्याबरोबर खाण्यास द्यावेत.
Leave a Reply