साहित्य – कस्टर्ड पावडर (आपल्या आवडीनुसार फ्लेवर घ्यावा), अननस, सफरचंद, चिक्कू, केळ, संत्रे, मोसंबी, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर.
कृती – आपण वेगवेगळ्या सॅन्डविचची चव घेतो. परंतु गोड सॅन्डविच हा प्रकार खूप कमी वेळा टेस्ट करत असतो. खरे तर या सॅन्डविचच्या माध्यमातून विविध फळे खाल्ली जातात. हे सॅन्डविच करताना प्रथम अननस, सफरचंद, चिक्कू, केळ, स्ट्रॉबेरीचे पात्तळ आणि बारीक काप करुन घ्या. आता मोसंबी, अंजीर, संत्रे सोलून त्याचे बारीक भाग करुन घ्या. ब्रेडच्या कडा कापून घ्या. कस्टर्ड पावडर दुधात भिजवून तीचा दोन्ही ब्रेडच्या स्लाईसला कोट करा. आता कोट केलेला भाग वर ठेऊन त्यावर ही फळे आपल्याला हवी तशी पसरवून घ्या. आता ब्रेडचा दुसरा स्लाईस वरती ठेऊन आतल्या फळांचा कोट व्यवस्थीत कव्हर करा. आता ह्या स्लाईस त्रिकोणी भागात कापून घ्या. हेल्दी आणि स्वीट सॅन्डविच तयार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply