साहित्य: २ कप स्वीट कॉर्नचे दाणे (कच्चे), १ टीस्पून बटर, २ ते ३ टेस्पून भोपळी मिरची, मध्यम चिरून, २ ते ३ टेस्पून गाजर, मध्यम चिरून, २ टेस्पून कोबी, चिरून १ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १/४ टीस्पून पांढरी मिरपूड, चवीपुरते मीठ, २ टीस्पून साखर, पाती कांदा, फक्त हिरवा भाग सजावटीसाठी.
कृती: स्वीट कॉर्न प्रेशर कुकरमध्ये ४ शिट्ट्या करून शिजवून घ्या. २ पैकी दीड वाट्या स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. बारीक भोकाच्या चाळणीवर गाळून घ्या. कढई गरम करून त्यात बटर घालावे. भोपळी मिरची, गाजर, कोबी घालून मिनिटभर परतावे. आता गळलेली प्युरी आणि उरलेले १/२ कप अख्खे दाणे घालावे. तसेच साधारण अडीच पाणी घाला. लहान वाटीत कॉर्न फ्लोअर आणि १/२ कप पाणी घालून मिश्रण तयार करावे. सूपला उकळी आली की त्यात दाटसरपणासाठी कॉर्न फ्लोअरचे मिश्रण घालावे. मीठ, साखर आणि मिरपूड घालावी. मध्यम आचेवर मिनिटभर उकळी काढावी. सूप सर्व्हिंग बोलमध्ये वाढावे. कांद्याची पात बारीक चिरून सजवावे. गरमच सर्व्ह करावे.
Leave a Reply