साहित्य : २५० ग्रॅम हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, १ टीस्पून हळद पावडर, १ टेबलस्पून तेल,
१/२ टीस्पून मोहरी, २ टेबलस्पून लिंबाचा रस.
कृती : हिरव्या मिरच्या धुऊन त्या लांबसर चिरुन घ्या.
कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरीची फोडणी द्या. नंतर त्यात हळद पावडर घालूनपरतून घ्या.
मिरची, मोहरी आणि मीठ घालून मिरची पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या.
त्यानंतर त्यावर लिंबाचा रस घालून गॅस बंद करा. आणि पराठ्याबरोबर सर्व्ह करा.
Leave a Reply