ताज्या पीठाची खमंग भाजलेली भाकरी करून घ्या. कोवळी कादा पात स्वच्छ धुऊन कांद्यासकट चिरून घ्या. त्यात दाण्याचे कुट,तिखट,मीठ,धनेजीरे पुड घालुन थोडे लिंबु पिळा. फोडणीच्या कढल्यात थोडे जास्त तेल घाला. त्यात मोहरी, हिंग, हळद, तिखट व बारीक चिरलेला लसुण घाला.लसूण लाल झाला की फोडणी कांदापातीच्या मसाल्यावर ओता. मिक्स करा. लसूण जरा जास्त घातला की चव छान येते. आता भाकरीचा पापुद्रा अलगद मोकळा करा व त्यात हा मसाला भरा व रोल करून खा. झणझणीत मसाला भाकरी तयार. खूप छान लागते.
About खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप
71 Articles
श्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...
Leave a Reply