तांदुळाच्या पिठाच्या चकल्या

साहित्य:- १ कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १/४ कप बटर, चवीपुरते मीठ, १/२ टीस्पून जिरे २ टीस्पून वाटलेली मिरची पेस्ट, तळणीसाठी तेल.

कृती:- तांदळाचे पीठ एका खोलगट भांड्यात घ्यावे. लहान पातेल्यात पाणी गरम करावे. त्यात मीठ, जिरे, मिरचीची पेस्ट आणि बटर घालावे. बटर वितळून पाण्याला उकळी येऊ द्यावी. पाणी उकळले कि लगेच तांदळाच्या पिठात घालून चमच्याने मिक्स करावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे. कोमट झाले कि मऊसर मळून घ्यावे. चकली यंत्राला आतून तेलाचा हात लावावा आणि तयार उकड भरून घ्यावी. तळणीसाठी तेल गरम करावे. आच मिडीयम आणि हायच्या बरोबर मधोमध ठेवावी.

प्लास्टिकच्या लहान कागदावर चकल्या पाडाव्यात चकल्या बदामी रंगावर तळून घ्याव्यात. तळलेल्या चकल्या पेपर टॉवेलवर काढून ठेवाव्यात म्हणजे अधिकचे तेल टिपून घेतले जाईल. चकल्या पूर्ण गार झाल्या कि डब्यात भरून ठेवाव्यात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*