साहित्य.२ वाटय़ा नारळाचे घट्ट दूध
२ चमचे तेल
१ लहान चमचा आले-लसूण पेस्ट
२-३ बटण मशरूम, उभे काप
१ टॉमेटो, मोठे तुकडे
१/२ वाटी लाल सिमला मिरची, उभी पातळ चिरून
१ लहान कांदा, बारीक चिरून
ब्रोकोलीचे ७-८ लहान तुरे
७० ग्राम टोफू, चौकोनी तुकडे
१ चमचा थाई रेड करी पेस्ट
कृती.१) तेल कढईत गरम करावे. त्यात कांदा आणि आले-लसूण पेस्ट परतावी.
२) आच एकदम मंद करून रेड करी पेस्ट घालावी. थोडे मिक्स करून टोफू आणि भाज्या घालाव्यात.
३) भाज्या २-३ मिनिटे परताव्यात. नंतर नारळाचे दूध घालावे. मिक्स करून अगदी थोडे पाणी घालावे. मंद आचेवर ५ मिनिटे उकळी काढावी.
भाताबरोबर थाई स्टय़ू सव्र्ह करावा.
टिपा.१) रेडीमेड थाई करी पेस्टमध्ये मीठ पुरेसे असते. त्यामुळे वेगळे घालावे लागत नाही. जर कमी वाटले तर थोडेसे मीठ घालू शकतो.
२) या स्टय़ूमध्ये टोफूऐवजी चिकनचे लहान तुकडे वापरू शकतो. शिजेस्तोवर मंद आचेवर उकळी काढावी.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
Leave a Reply