मागच्या भागात आपण डाएट पॅनची माहिती घेतली. आता आपण या डाएट पॅनचा उपयोग कसा करायचा ते बघू.
या सोप्या टिप्स अमलात आणा.
तळण्यासाठी टिप्स
डाएट पॅनमध्ये तळताना गॅस मध्यम ठेवावा.
तेलाची पातळी पॅनच्या अर्ध्यापेक्षा जास्त नसावी.
डाएट पॅन मध्ये तळताना तेलाचा धूर येत नाही. तेल उकळताना दिसत नाही. फक्त संथ तरंग उठताना दिसतात. ५ ते ७ मिनिटात तेल तापते.
तळुन उरलेले तेल करपलेले नसते आणि त्याचा रंगही बदललेला नसतो. हे तेल परत स्वयंपाकात वापरता येते.
डाएट पॅनमध्ये तेल करपत नाही. त्यामुळे तळताना तेल कमी वापरले जाते व पदार्थ सर्व बाजूंनी एकसारखा तळला जातो
लोणी कढवण्यासाठीच्या टिप्स
डाएट पॅनमध्ये लोणी कढवताना गॅस मंद ठेवावा. झाकण मुळीच लावू नये.
डाएट पॅनमध्ये कढवलेले तुप पांढरेशुभ्र रहाते व भांड्याच्या तळाला फारसे करपत नाही त्यामुळे खरवड एकदम कमी निघते व तुपाचे प्रमाण वाढते.
— सौ निलिमा प्रधान
Leave a Reply