साबुदाणा –टपोरा ,गोल दाणे असलेला साबुदाणा चांगला –वेडावाकडा /हाताळल्यावर फुटणारा साबुदाणा घेऊ नये –आणि घ्यावा लागलाच तर चांगला चाळून घ्यावा आणि थोडा भाजून घ्यावा.
साबुदाणा भिजवताना—साबुदाणा चांगला दोन/तीन वेळा पाण्याने धुवून घ्या आणि नंतर साबुदाणा पूर्ण भिजेल एव्हढे आणि वर अर्धा सेंटीमीटर पाणी राहील हे बघा. साबुदाणा एखाद्या उंच आणि झाकण वाल्या डब्यात भिजवावा. आणि एका तासाने तो डबा उलटा करून ठेवण म्हणजे वरून कोरडा पडणारा साबुदाणा देखील चांगला भिजतो –कमीतकमी ४ ते ६ तास भिजवणे
शेंगदाणे कुट करताना –शेंगदाणे मायक्रोवेव मध्ये एका वेळी पाव ते अर्धा किलो पसरट काचेच्या भांड्यात (मायक्रोवेव योग्य ) – २+२+१+१ मिनिटे हाय वर भाजावेत — + चा अर्थ मायक्रोवेव बंद करून भांडे बाहेर काढून दाणे ढवळावे आणि दाणे किती भाजले गेलेत हे पाहणे आणि परत भांडे आत टाकून मायक्रोवेव चालू करणे-( तुमच्या मायक्रोवेव च्या पावर प्रमाणे वेळ कमी जास्त लागेल ) भाजलेले शेंगदाणे साला सकट मिक्सर मध्ये भरड दळणे
बटाट्याच्या फोडी घालायच्या असल्यास अगोदर शिजवून घेता येईल किवा साबुदाण्या अगोदर जिरे तूप हिरव्या मिरच्यांचे तुकडे असलेल्या फोडणी मध्ये घालून शिजवता येईल –फक्त प्रत्येकाचा शिजण्याचा वेळ वेगवेगळा असेल
इतर पूर्व तयारी — तूप (साजूक किवा वनस्पती ) किवा शेंगदाणा तेल , जिरे ,हिरव्या /लाल मिरच्या चे तुकडे –एक ते दीड सेंटीमीटर ,आल्याचे बारीक तुकडे /किसून ,कढीपत्ता (चालत असेल तर ) , लाल तिखट ,मीठ ,साखर , जीरापुड
भिजवलेला साबुदाणा एखाद्या ताटात /पराती मध्ये काढून मोकळा करून घ्या . त्या मध्ये मीठ ,साखर ,लाल तिखट , दाणा कुट ,, जीरापुड ,आल्याचे तुकडे /कीस घालून चांगले मिक्स करा –चव बघा –खिचडी ची चव लागली पाहिजे -जे कमी वाटेल ते घाला आणि मिक्स करून ठेवा
मोठ्या पातेल्यात /कढई मध्ये जास्त तूप /तेल घालून तापत ठेवा , त्या मध्ये जिरे घाला , ते तडतडले की हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून परता , त्या वर बटाटा फोडणी मध्ये घाला –अगोदर शिजलेले नसेल तर झाकण ठेऊन थोडे पाणी शिंपडून शिजवून घ्या ( थोडे करकरीत राहूदे जास्त लगदा होई पर्यंत शिजवू नका ) नंतर साखर , मीठ दाणा कुट घालून ढवळा
दोन पर्याय करता येतील –एक या शिजलेल्या बटाट्यात वरील साबुदाणा मिश्रण घाला आणि चांगले ढवळा किवा –दोन- हे परतलेले व्यंजन ताटा /परातीतील साबुदाणा मिश्रणात ओता आणि नीट मिक्स करा –साबुदाणा खिचडीचे रेडीमिक्स तयार –या पुढे अनेक पर्याय – (एक) -वर कढई /पातेल्यात साबुदाणा घातलेला आहे ती झाकण ठेऊन एक वाफ आणून खिचडी करा.
विशेष टिप्स -साबुदाणा भिजवताना थोडे ताक घाला –साबुदाणा मोकळा राहून खिचडी मोकळी होते
शेंगदाण्याचे कूट जास्त असेल तर साबुदाणा मोकळा तर राहतोच पण खिचडीची चव देखील वाढते , शेंगदाण्याचे कूट नसेल तर खिचडी चिकट गोळा होते.
खिचडी परत गरम करताना जर खिचडीवर दुधचा /ताकचा हबका मारून गरम केली तर मोकळी होते -(पाण्या पेक्षा )
फ्रीज मध्ये साबुदाणा वाळत जातो त्यामुळे परत गरम करताना खिचडीवर पाणी /दुध /ताक चा हबका मारणे आवश्यक असते.
वनस्पती तुपातील खिचडी साजुक तुपा पेक्षा जास्त खमंग लागते –कदाचित सढळ हस्ते तूप वापरल्या मुळे असेल.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply