साहित्य:- १ कप जस्मिन राईस, ३ टेस्पून तेल, ३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून सोयासॉस, १ टिस्पून चिंचेचा कोळ, १ टिस्पून साखर, १/४ कप भोपळी मिरची (उभी चिरलेली), १/४ कप कांदा (पातळ उभा चिरलेला), १/२ ते ३/४ कप टोफू (१ इंच चौकोनी तुकडे), ३/४ कप बेसिलची पाने, १ लहान गाजर (चौकोनी तुकडे)
१/४ कप मटार (ऐच्छिक), चवीपुरते मिठ
कृती:- जस्मिन राईस धुवून घ्यावा. दिड ते दोन कप पाणी गरम करावे त्यात थोडे मिठ घालावे. पाणी उकळले कि त्यात धुतलेला जस्मिन राईस घालून गॅस मध्यम करावा. वर झाकण ठेवून भात मोकळा शिजवून घ्यावा. टोफूचे तुकडे कमी तेलावर शालोफ्राय करून घ्यावेत. लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. तेल गरम करून त्यात लसूण मिरचीचे वाटण घालून परतावे नंतर गाजराचे तुकडे घालून ३० सेकंद परतावे. त्यात भोपळी मिरची, कांदा घालून फक्त १० सेकंद परतावे. कांदा आणि भोपळी मिरचीचा करकरीतपणा तसाच राहिला पाहिजे. लगेच भात, चिंचेचा कोळ, साखर, सोयासॉस आणि लागल्यास मिठ घालावे आणि निट मिक्स करावे. घातलेले जिन्नस भाताला सारखे लागले पाहिजेत. भात निट मिक्स केल्यावर बेसिलची पाने आणि शालोफ्राय केलेला टोफू घालून अलगद मिक्स करावे आणि लगेच सर्व्ह करावे.
टीप:- टोफू घातल्यावर हलक्या हातानेच मिक्स करावे नाहीतर टोफू मोडला जातो. बेसिलची पाने घातली खुप जास्तवेळ मिक्स करू नये त्यामुळे उष्णतेने ती कोमेजतात.
आपल्या आवडीप्रमाणे चिंचेच्या कोळाऐवजी अर्धा टिस्पून विनेगरही घालू शकतो. थाई फ्राईड राईसमध्ये खरंतर फिशसॉस वापरतात. फिशसॉसला थोडी आंबटसर चव असते. नॉनवेज लोकांनी चिंच, विनेगर ऐवजी फिशसॉस वापरला तरीही हरकत नाही.
जस्मिन राईस नेहमीच्या भातापेक्षा जड असतो आणि पटकन पोटही भरते त्यामुळे त्या अंदाजाने भात शिजवावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply