टोफू सोयाबीनच्या दूधापासून तयार होते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. थायरॉईडची समस्या उद्भवल्यावर सोयाबीनचे सलाड खाण्यास सांगीतले जाते.
न्यूट्रिशनिस्टच्या मते – पनीर टेस्टी बनवण्याच्या नादात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल-मसाले आणि काजू यासारखे पदार्थ टाकून कॅलरीचे प्रमाण वाढवले जाते. त्याऐवजी थोडे तेल, मसाले आणि पालक व अन्य भाज्यांचे कॉम्बिनेशनने तुम्ही याची चव वाढवू शकता. ज्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे त्यांनी टोफू पनीर खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. सोया पनीर हे सोयाबीनपासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये सर्वांत जास्त लोकप्रिय आहे आणि ते दुधाच्या पनीरला एक 100 टक्के शाकाहारी पौष्टिक व स्वास्थ्यवर्धक पर्याय आहे. दूध पनीर जास्त महाग असल्यामुळे देशातील बहुतांश लोक त्याचा पाहिजे तितका वापर करू शकत नाहीत. परंतु सोया पनीरची बाजारातील किंमत दूध पनीरच्या अर्धीच असून, चव मात्र पनीरसारखीच लागते. सोया पदार्थांचे औषधी फायदे व याचा कमी उत्पादन खर्च या दोन्ही गोष्टींमुळे सोया पनीर लवकरच दूध पनीरइतकेच लोकप्रिय होऊ शकेल. यामध्ये पिष्टमय पदार्थ कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी उत्कृष्ट आहार आहे. टोफू नेहमी पाण्यात ठेवलेलंच मिळतं, पाणी काढून टाकून ते वापरायचं. थाई करी, सूप, अंडं न घालता केलेले केक, पुडिंग्ज्, चीज केक यात टोफूचा वापर होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply