साहित्य:- २ वाट्या सोयाबिनचे पीठ , अर्धी वाटी टोमॅटो प्युरी (उकळत्या पाण्यात घालून पाच मिनटाने थंड पाणी ओतून साल काढावे. मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.), पाऊन ते एक वाटी पाणी, तिखट, मीठ, तेल, मोहन व तळण्यासाठी , १ टेबलस्पून बेसन.
कृती:- सोयाबीन खमंग भाजून पीठ दळून आणावे. पिठात तिखट, मीठ, व तीळ घालावे. पाणी, टोमॅटो प्युरी व २ चमचे तेल गरम करावे.(उकळी येण्यापूर्वी) त्यात पीठ घालून ढवळून उतरवावे. एका तासाने बेसन घालून मळून गरम तेलात हलकेच चकली तळावी. कागदावर एकावेळी तळणार तेवढ्याच चकल्या घालून लगेच तळाव्या. टोमॅटो प्युरीएवजी मेथी, पालक, पुदिना इत्यादी वाटून त्याच्या पाण्याने पीठ भिजवता येते. थोडेसे उडदाचे पीठ घातले तर चकली खुसखुशीत होते. शिवाय करताना मोडत नाहीत. नाचणी पीठ वापरूनही चकल्या करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply