साहित्य: २ टोमॅटोंचा रस, १ कप नारळाचं पातळ दूध, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, २ चिमटी हिंग, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), पाव टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, आवडत असल्यास वरून घालायला थोडी कोथिंबीर
कृती: तुपाची जिरं घालून फोडणी करा. त्यात कढीपत्ता, मिरची, हिंग घाला. टोमॅटोचा रस घाला. मंद आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत उकळा. टोमॅटो अर्धवट शिजला की अर्धा कप पाणी घाला. पूर्ण शिजू द्या. नंतर त्यात मीठ, साखर, नारळाचं दूध घाला. मंद आचेवर उकळा. वरून कोथिंबीर घाला.
Leave a Reply