साहित्य – दोन ते तीन वाटया कणकेचं पीठ, दोन ते तीन चिरलेले टोमॅटो, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, गोडा मसाला, चवीनुसार तिखट, थोडीशी साखर, मीठ, अर्धी वाटी तेल.
कृती – दोन ते तीन चिरलेले टोमॅटो मिक्सरमध्ये लावून त्याची प्युरी करावी. या प्युरीत तिखट, मीठ, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, चवीपुरती साखर घालून प्युरी चांगली एकजीव करावी. प्युरीतील साखर विरघळल्यावर त्यात मावेल इतकं पीठ घालावं. तेलाचा हात लावून पीठ मळून घ्यावं. तयार गोळयाच्या पोळया लाटून त्या तूप किंवा तेलावर भाजून घ्याव्यात. या पराठयांचं वैशिष्टय म्हणजे ते मस्त गुलाबीसर रंगाचे दिसतात आणि खायलाही तितकेच चविष्ट लागतात.
Leave a Reply