साहित्य :- ३ वाटय़ा बासमती शिजलेला भात, २ मोठे टोमॅटो, बारीक चिरून, ३ ते ४ मोठय़ा लसूण पाकळ्या, मध्यम तुकडे, २ चमचे तेल किंवा तूप, २ चिमूट जिरे, १/८ चमचा हिंग, २ हिरव्या मिरच्या
७-८ कढीपत्ता पाने, चवीपुरते मीठ, कोथिंबीर बारीक चिरून.
कृती:- कढईत तूप गरम करून त्यात सर्वात आधी लसूण घालावी. मोठय़ा आचेवर परतावे. लसूण परतली गेली की जिरे, हिंग, हिरवी मिरची आणी कढीपत्ता घालून थोडा वेळ परतावे. चिरलेले टोमॅटो फोडणीस घालावे, बरोबर मीठही घालावे. झाकण ठेवून मोठय़ा आचेवर परतावे. टोमॅटो पूर्ण मऊ होऊन कडेने तेल सुटले पाहिजे. यात शिजलेला भात मोकळा करून घालावा आणि मिक्स करावे. टोमॅटोचा तयार मसाला सर्व भाताला व्यवस्थित लागला पाहिजे. झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी. कोथिंबिरीने सजवून गरमच सव्र्ह करावे.
टीपा :- हिरव्या मिरच्यांऐवजी लाल सुक्या मिरच्यासुद्धा वापरू शकतो. लसूण व्यवस्थित परतली गेली पाहिजे (करपू देऊ नये.) जर लसूण कच्ची राहिली तर तेवढी चांगली चव भाताला येत नाही. ताजे, लाल, आणि पूर्ण पिकलेले टोमॅटो वापरावेत. त्यामुळे रंग आणि चव दोन्ही छान येते. आवडीप्रमाणे गरम मसाला घालू शकतो. चव छान लागते. पण गरम मसाल्याने टोमॅटोचा स्वाद नाहीसा होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply